esakal | धुळे ग्रामीणमध्ये पाच, तर साक्रीत दोन ग्रामपंचायतींवर भगवा 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे ग्रामीणमध्ये पाच, तर साक्रीत दोन ग्रामपंचायतींवर भगवा 

साक्रीतील उभरांडी या दोन ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. शिवसेनेने ग्रामपंचायतींवर निर्विवाद भगवा फडकविला आहे.

धुळे ग्रामीणमध्ये पाच, तर साक्रीत दोन ग्रामपंचायतींवर भगवा 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः ग्रामपंचायत निवडणुकीत माघारीअंती धुळे तालुक्यातील मोरदड, आमदड-वजीरखेडे, बोरविहीर, पुरमेपाडा, रामी या पाच ग्रामपंचायतींवर, तर साक्री तालुक्यातील दारखेल, निळगव्हाण या दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकला असून, एकूण सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व राखले आहे.

आवश्य वाचा- केंद्र सरकारकडून दिलासा; आठवडाभरात मका खरेदी पुन्हा सुरू होणार 

धुळे ग्रामीणमध्ये चिंचवार आणि साक्रीतील उभरांडी या दोन ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. 
शिवसेनेने ग्रामपंचायतींवर निर्विवाद भगवा फडकविला आहे. मोरदडचे पॅनलप्रमुख गोविंद पाटील, रामीचे रोहिदास महाजन, बोरविहीरचे किरण ठाकरे, अनिल गवळी, पुरमेपाडाचे योगेश पाटील, सुदाम देसले, आमदडचे गजानन मराठे, भावडू पाटील, बाबरेचे प्रवीण भालेकर आणि बेंद्रेपाड्याचे नाना पाटील, दीपक पाटील यांनी ग्रामपंचतींमधील जागा बिनविरोध केल्या. या सर्वांचा शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

बिनविरोध निवडणूका

धुळे ग्रामीण आणि साक्री तालुक्यातील बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य व भावी सरपंचांचे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, लोकसभा संघटक भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख आधार हाके, किरण जोंधळे,आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image