सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच नवनिर्वाचित सदस्यांची पळवापळवी सुरू  ​

एल. बी. चौधरी
Tuesday, 2 February 2021

सरपंचपदाच्या आरक्षणानंतर ग्रामपंचायत आपल्या पक्षाच्या ताब्यात राहावी म्हणून जिल्ह्यातील नेतेही लक्ष घालून आहेत.

सोनगीर : सरपंचपदाचे आरक्षण पूर्ण झाल्याने सोमवारी झाले आणि नवनिर्वाचि ग्रामपंचायत सदस्य पळवापळवीला सुरवात झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडणूक जाहीर झाली असून, साधारणतः दहा दिवसांत निवड होण्याची शक्यता असल्याने राजकीय डावपेचाला सुरवात झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडीतून ग्रामपंचायत सदस्य आपल्या निवडीचा खर्च काढण्यात यशस्वी होतील, असे काही गावांतील विशेषतः इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण झालेल्या ग्रामपंचायतींत बोलले जात आहे. ग्रामपंचायत आपल्या पक्षाच्या ताब्यात राहावी म्हणून जिल्ह्यातील नेतेही लक्ष घालून आहेत.

आवश्य वाचा-  नारळाच्या झाडांमागे गांजा लपवत तस्करी; पोलिसांनी केला आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश 

धुळे तालुक्यातील निवडणूक झालेल्या व न झालेल्या सर्व १३१ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यातून महिला सरपंचाचे आरक्षण सोमवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी भीमराव दराडे, निवडणूक अधिकारी बी. बी. ठाकरे, श्रीकांत देसले यांच्या देखरेखीखाली चिठ्ठ्या टाकून काढले. महिलांना ५० टक्के आरक्षण लागू असल्याने अनुसूचित जातीच्या सात ग्रामपंचायतींपैकी चार महिलांसाठी, अनुसूचित जमाती २३ पैकी १२, इतर मागासवर्गीयांच्या ३६ पैकी १८ आणि सर्वसाधारण ६१ सरपंच आरक्षणापैकी ३१ सरपंच महिलांसाठी राखीव झाले. 

आवर्जून वाचा- कोरोना लसिकरण नियमांचे उल्लंघन; जामनेर रुग्णालयात १६ वर्षांच्या मुलाला दिली लस 
 

तालुक्यातील महिला ग्रामपंचायत सरपंच आरक्षण असे : अनुसूचित जाती : नगाव/तिसगाव/वडेल/ढंढाणे, नंदाळे बुद्रुक, निमडाळे, रामी. अनुसूचित जमाती : वणी बुद्रुक, मोघन, सावळी-सावळीतांडा, कापडणे, कुलथे, जुनवणे, दोंदवाड, चांदे, सोनगीर, बेंद्रेपाडा, शिरधाने प्र.नेर, मुकटी. नागरिकांचा मागास प्रवर्ग : पाडळदे, धमाणे/धोडी, नाणे, सांजोरी, बोरसुले/नवे कोठारे, बांबुर्ले प्र. नेर, पुरमेपाडा, लळिंग/दिवाणमळा, रानमळा, तामसवाडी/हेंकळवाडी, नेर, शिरधाने प्र.डा., कुंडाणे (वार), लामकानी, धाडरा, गोंदूर, अजंग/कासविहीर, कौठळ. सर्वसाधारण : आंबोडे, काळखेडे, जुन्नेर, दह्याणे, बोरकुंड, मोरदड, मोहाडी प्र. डांगरी, मांडळ, लोणखेडी, वडजाई, वेल्हाणे बुद्रुक, सडगाव/हेंकळवाडी, कुंडाणे तांडा, चौगाव/हिंगणे, विश्वनाथ/सुकवड, होरपाडा, उभंड, तरवाडे, रावेर, बुरझड, फागणे, भिरडाणे/भिरडाई, मेहरगाव, तिखी, सातरणे, विंचूर, आर्वी, गरताड, नंदाळे खुर्द, बाभूळवाडी, बोरविहीर.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat politic marathi news songire dhule new members hiding start