नंदुरबार- शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेत आमदारकी मिळाल्यानंतर त्यांचे प्रथमच नंदुरबारमध्ये शनिवारी (ता. २२) सायंकाळी आगमन झाल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ४० जेसीबींनी आमदार रघुवंशींवर पुष्पवृष्टी करण्यात आली.