Grape Production
sakal
नाशिक: अतिवृष्टीने यंदा द्राक्षाचे झालेले प्रचंड नुकसान फक्त शेतकऱ्यांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर त्याची झळ आता कागद उद्योगालादेखील बसू लागली आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादन कोसळल्याने या उद्योगातील कागदाच्या मागणीत तब्बल ७० टक्के घट झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. द्राक्षशेतीच्या नुकसानीमुळे इतर घटकांवरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यातून कच्चा व रद्दी उद्योग अधिक प्रभावित झाला आहे.