Nandurbar Road Damage: डांबराविनाच टाकली खडी! कालीबेल-पाडली ते अस्तंबा रस्ता बनतोय धोकादायक

रस्ता नव्याने होत असला तरी तो निकृष्टतेमुळे कायमचाच धोकादायक असेल, अशी शंका उपस्थित करीत काम तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे.
Gravel spread on Kalibel-Astamba road without tarmac.
Gravel spread on Kalibel-Astamba road without tarmac. esakal

सिसा : रस्त्याच्या नवीन कामाला मंजुरी मिळाल्याने कालीबेल (ता. धडगाव) भागातील नागरिक धोकादायक प्रवासापासून सुटकेचा निःश्वास घेत होते; परंतु ठेकेदार व संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या मनमानीतून कालीबेल ते अस्तंबा रस्त्यावर डांबराविनाच खडी पसरविण्यात आली.

यातून रस्ता नव्याने होत असला तरी तो निकृष्टतेमुळे कायमचाच धोकादायक असेल, अशी शंका उपस्थित करीत काम तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे. (Gravel laid without asphalt Kalibel Padli to Astamba road becoming dangerous Nandurbar Road Damage news)

सुरक्षित व दर्जेदार रस्त्यासाठी जुने डांबर पूर्णपणे काढून नव्याने कामाला सुरवात होणे अपेक्षित असते; परंतु नव्याने मंजूर झालेल्या कालीबेल ते अस्तंबा या रस्त्यावर जुने डांबर असतानाच खडी पसरविण्यात येत आहे, तेही डांबराचा कुठलाही वापर न करता.

त्यामुळे नागरिकांमध्ये रस्त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होऊ लागली. या शंकेतून कालीबेल, पाडली व अस्तंब्यासह असली भागातील नागरिक या कामाकडे बारीक लक्ष ठेवून होते.

त्यात ठेकेदाराने कुठलेही फलक लावले नसल्याचे दिसून आले. फलक लावले नसल्याने कामात पारदर्शकताही ठेवत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

विनाआधार खडी टाकली गेल्याने संपूर्ण खडी अस्ताव्यस्त झाली असून, ती वाहतुकीला धोक्याची ठरत आहे. या कामाचा वाहतुकीला आताही धोका नंतरही धोकाच राहणार म्हणून तातडीने हे काम बंद करीत पारदर्शक कामाला सुरवात करावी, अशी मागणी केली जात आहे.‌

न केल्यास परिसरातील नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला जात आहे.

Gravel spread on Kalibel-Astamba road without tarmac.
Nandurbar News: राज्यातील सर्व बंजारा तांड्यांना महसूल दर्जा मिळणार! अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या मागणीला यश

पारदर्शकतेची गरज का भासत नाही

रस्ताकामात पारदर्शकता आणण्यासाठी कामाशी संबंधित प्रशासकीय विभाग, मक्तेदार, कामाची मंजुरी व निधीची नोंद असणारे फलक लावत रस्ताकामाच्या पद्धती व स्थर दर्शविणे आवश्यक होते; परंतु त्याची कुठल्याच यंत्रणेला गरज भासली नाही.

किमान संबंधित प्रशासन यंत्रणेला तरी ती उणीव निदर्शनास येणे अपेक्षित होते, मात्र तसेही होत नसल्याने या यंत्रणेच्या भूमिकेवरही शंका उपस्थित होते.

डोळस लोकप्रतिनिधींची गरज

दर्जेदार काम होत नसल्याचे सर्वसामान्यांना उघडपणे दिसते. असे असताना ही बाब लोकप्रतिनिधींच्या लक्षात का येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

निकृष्ट कामाकडे लक्ष देत लोकप्रतिनिधींनी सुरक्षित व दर्जेदार कामासाठी संबंधितांकडे पाठपुरावाही करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Gravel spread on Kalibel-Astamba road without tarmac.
Nandurbar News : तळोद्यात गाळ्यांच्या लिलावात कोटीचे उड्डाण! 82 दुकानांच्या लिलावातून मिळाले 1 कोटी 4 लाख 27 हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com