Nandurbar News : दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज : पालकमंत्री अनिल पाटील

कोणत्याही आपत्तीत शासन जनतेप्रति वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले.
Guardian Minister Anil Patil during main flag hoisting ceremony on Republic Day in second photo Anila Patil receiving salute from police team
Guardian Minister Anil Patil during main flag hoisting ceremony on Republic Day in second photo Anila Patil receiving salute from police team esakal

Nandurbar News : राज्यात व जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असल्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज असून, कोणत्याही आपत्तीत शासन जनतेप्रति वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले.

पोलिस कवायत मैदानावर ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजवंदन समारंभात ते जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. (Guardian Minister Anil Patil statement Government administration ready to face drought nandurbar news)

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, गणेश मिसाळ, कल्पना निळ-ठुबे, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विविध यंत्रणांचे प्रमुख-कर्मचारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की राज्यात भीषण टंचाई आणि दुष्काळाचे सावट आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन जनतेच्या पाठीशी उभे आहे. जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळांपैकी नंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यांतील २१ महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन.

शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३ पूर्णांक ५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजनेच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे यांसारखे दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत.

Guardian Minister Anil Patil during main flag hoisting ceremony on Republic Day in second photo Anila Patil receiving salute from police team
Nandurbar News : जिल्ह्यात 12 लाख 72 हजार 150 मतदार : जिल्हाधिकारी सावन कुमार

६७ कोटी ६७ लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची मागणी

पालकमंत्री पाटील म्हणाले, की नंदुरबार तालुक्यातील १५५ गावांमधील ५१ हजार २२८ शेतकऱ्यांना सुमारे ७२ हजार हेक्टर आर. एवढ्या क्षेत्रासाठी ६७ कोटी ६७ लाख ४३ हजार ३०५ रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पाच हजार ७५६ शेतकऱ्यांच्या सुमारे दोन हजार ८५१ हेक्टर आर. पेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी चार कोटी ९५ लाख ४३ हजार रुपये एवढे अनुदान शासनाने उपलब्ध करून दिले असून, आतापर्यंत चार हजार ३४३ शेतकऱ्यांना तीन कोटी ७९ लाख २३ हजार २७४ रुपये ऑनलाइन प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

१२४ गावांमध्ये जलयुक्त शिवार

ते म्हणाले, की दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी व शाश्वत स्वरूपाची उपाययोजना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यातील १२४ गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पाच हजार ६२२ कामांना जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे ७५८ टीएमसी जलसाठा निर्माण होऊन दोन हजार २७४ हेक्टर क्षेत्रास त्याचा लाभ होणार आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात एक लाख ५६ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असून, २५७ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

‘महासंसस्कृती’ महोत्सव

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात पाचदिवसीय ‘महासंसस्कृती’ महोत्सव तसेच राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्य ‘जाणता राजा’ आयोजन २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी या वेळी केले आहे.

Guardian Minister Anil Patil during main flag hoisting ceremony on Republic Day in second photo Anila Patil receiving salute from police team
Nandurbar News : वाहन चालविण्याचे नियम पाळा, सुरक्षित राहा...!

आरोग्यावर विशेष लक्ष

ते म्हणाले, की जिल्ह्यात सशस्त्र सेनादल वैद्यकीय महाविद्यालय, पुणे व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे आदिवासी जनतेतील सिकलसेल आजाराविरोधात लढा दिला जात आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने कॅपिलरी झोन हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस ही रक्ताची तपासणी करण्यात येत आहे, तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांची एक ऑनलाइन नोंदणीसाठी केअर फॉर सिकल नावाचे वेबपोर्टल तयार करण्यात आलेले आहे.

त्यामुळे वेळेत, अचूक निदान, सर्व नोंदींचे जतन करणे, तसेच बाधित व वाहक रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सिकलसेल निर्मूलनासाठी ही लॅब एक मैलाचा दगड आहे. आजअखेर एक लाखापेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे.

या लॅबच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व बालकांच्या तपासणीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण ९६ टक्के इतके झाले असून, सुरक्षित मातृत्व व सुरक्षित बालकांच्या भविष्याच्या दृष्टीने हे चित्र निश्चितच आशादायी आहे.

कौशल्य विकास केंद्रांची स्थापना

जिल्ह्यात ११ गावांत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, त्यात ३९० उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमांत महाविद्यालयीन वऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील विभागस्तरावर अंतिम निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बीजभांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Guardian Minister Anil Patil during main flag hoisting ceremony on Republic Day in second photo Anila Patil receiving salute from police team
Nandurbar News : तळोद्यात वळूच्या हल्ल्यात एक जखमी; बंदोबस्ताची नागरिकांची मागणी

यांचा झाला सन्मान

-ध्वजनिधी संकलनात १०४ टक्के इष्टांक वसूल केल्याबद्दल स्मृतिचिन्ह ः जिल्हाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नंदुरबार

-मुंबई शहर जलद प्रतिसाद पथकात कठीण व खडतर सेवा केल्याबद्दल २०२२-२३ वर्षासाठी मुंबई शहर

जलद प्रतिसाद पथकाचे विशेष सेवा पदक व प्रशस्तिपत्र प्रदान ः राजेश गावित, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक कक्ष, नंदुरबार, प्रदीप वळवी, पोलिस नाईक, शहर वाहतूक शाखा, नंदुरबार, कृष्णा जाधव, पोलिस शिपाई, पोलिस ठाणे, शहादा, अशोक वसावे, पोलिस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलिस मुख्यालय, नंदुरबार .

उत्कृष्ट वन व वन्यजीव संरक्षण, अतिक्रमण निर्मूलन मोहीम यशस्वी राबवून एक हजार ५२५ हेक्टर वनजमीन शासन ताब्यात घेतली. या उत्तम कार्याबद्दल सन्मानचिन्ह ः स्नेहल अवसरमल, वनपरिक्षेत्र अधिकारी, रोहयो नंदुरबार, अरविंद निकम, वनपाल, भांगडा, किसन वसावे, वनरक्षक भांगडा, नयना हडस, वनरक्षक सोनपाडा, प्रियंका निकुंबे, वनपाल, भांगडा.

Guardian Minister Anil Patil during main flag hoisting ceremony on Republic Day in second photo Anila Patil receiving salute from police team
Dhule News : शिंदखेड्यात अखेर नवीन भाजीपाला मार्केट सुरू!

एकात्मिक महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रशस्तिपत्र ः जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार, मेडिकल सर्जिकल आणि डेंटल हॉस्पिटल, नंदुरबार

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांना महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत प्रत्येकी रुपये एक लाख बीजभांडवल, प्रमाणपत्र ः दिनेश गिरासे, अन्सारी सुफियान, पठाण फैजनखान इरफानखान, आर्या बागूल, शेख रियान मुक्तार, सईद सैफ सईद नैमुद्दीन.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

नंदुरबार ः भारतीय ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, गणेश मिसाळ, कल्पना निळ-ठुबे, संजय बागडे.

उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या...

Guardian Minister Anil Patil during main flag hoisting ceremony on Republic Day in second photo Anila Patil receiving salute from police team
Dhule News : जिल्ह्यात शेतकऱ्यांना 122 कोटींचा निधीवाटप : पालकमंत्री महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com