
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर गुटखा जप्त
खापर : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गालगत येथील ओम शांती गुरू किराणा दुकानात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पान मसाला व तंबाखू जप्त केला. एक लाख ८१ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.
पोलिस नाईक मनोज सुदाम नाईक यांनी फिर्याद दिली आहे. त्यात महाराष्ट्र राज्यात पान मसाला व तंबाखू विक्रीवर प्रतिबंध असताना खापर येथील ओम शांती किराणा दुकानात विमल पान मसाला व तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने शुक्रवारी (ता.३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुमारास छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान माल बाळगणे व विक्री प्रकरणी आशिष रमेशचंद जैन (वय ३२) व दलपतसिंग लालसिंग राजपुरोहित दोघे राहणार खापर यांच्यावर अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राजेश गावित करीत आहे.
हेही वाचा: खेळायला गेलेले मित्र परतलेच नाही; सकाळी फोन आला अन्...
हेही वाचा: राज्यात कोरोनाची चौथी लाट? मास्क सक्तीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...
Web Title: Gutkha Seized On Barhanpur Ankleshwar Highway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..