अन्‌ जिल्हाधिकारी आले बांधावर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

पहूर (ता. जामनेर) ः पहूर येथून जवळच असलेल्या सांगवी (ता. जामनेर) येथे तीन दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे गोगडी नदीच्या पुरात शेतकऱ्यांच्या उभी पिकांसह जमीन वाहून गेल्याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत आज (ता.5) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय नियमाप्रमाणे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच 2 नोव्हेंबरला सांगवीसह परिसरात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. त्यामुळे गोगडी नदीला आलेल्या पुराने नदी काठालगतच्या अमोल सुधाकर घोंगडे, विलास चिंधूबा लहासे, भिका लक्ष्मण घोंगडे, हितेंद्र जाधव, सुदाम राऊत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी शेताच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शासकीय निकषाप्रमाणे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. ज्या शेतकऱ्यांचा पिकविमा नाही; त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मदत दिली जाणार. काही शेतकऱ्यांच्या विहीरी ढासळल्या आहेत. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश डॉ. ढाकणे यांनी दिले. यावेळी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, तलाठी सुनील राठोड, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, रामेश्वर पाटील, शंकर घोंगडे, अरविंद देशमुख, अशोक बनकर, सुभाष नाथ यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain collector farmer tolking farmer jamner sangvi