RRR Centre News : शिरपूर पालिकेंतर्गत ट्रिपल आर सेंटरला सुरवात; शहर स्वच्छतेला मदत

Shirpur: Principal Tushar Nerkar, Engineer Madhav Patil, Administrative Officer Sanjay Haswani, Sangeeta Devare and office bearers during the inauguration of Triple R Center of the municipality
Shirpur: Principal Tushar Nerkar, Engineer Madhav Patil, Administrative Officer Sanjay Haswani, Sangeeta Devare and office bearers during the inauguration of Triple R Center of the municipalityesakal
Updated on

Dhule News : केंद्रीय गृहनिर्माण विभाग व नागरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत साकारलेल्या ट्रिपल आर सेंटरचे मंगळवारी (ता. २३) उद्‍घाटन करण्यात आले.

स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये सहभागी झालेल्या शिरपूर पालिकेतर्फे मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर या संकल्पनेतून ट्रिपल आर सेंटर उभारण्यात आले आहे.

स्वच्छता अभिानाच्या ब्रॅन्ड ॲम्बॅसेडर माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटरची निर्मिती करण्यात आली. (Helping city cleanliness through concept of reduce reuse recycle Triple R Center started under Shirpur Municipality Dhule News)

नत्थूनगरमध्ये झालेल्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, नगरअभियंता माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, नोडल अधिकारी सागर कुळकर्णी, विभागप्रमुख भाईदास भोई, जयवंत माळी, राकेशकुमार वाडिले, दीपक मराठे, सुनील सोनवणे, कैलास चौधरी, रज्जाक कुरेशी, राजू शेख, कविता बाविस्कर, मीनल स्वर्गे, मुरलीधर स्वर्गे उपस्थित होते. आरोग्य सहाय्यक दीपाली साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. शहर समन्वयक दिव्या शिंदे, प्रज्ञाशील निकम, प्रकल्प समन्वयक सुषमा पवार यांनी संयोजन केले.

ट्रिपल आरद्वारे शहर स्वच्छता

रिड्यूस, रियूज आणि रिसायकल अशा तीन पद्धतींचा अवलंब करून शहर स्वच्छ करण्यासाठी या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

वापरलेली जुनी पुस्तके, पेपर रद्दी, जुने चप्पल व बूट, जुने परंतु स्वच्छ कपडे, खराब खेळणी आदी येथे संग्रहित केली जाणार असून, पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणार आहेत.

शहरात फिरून या वस्तू गोळा करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत व नत्थूनगरमध्ये अशी दोन केंद्रे असल्याची माहिती नेरकर यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shirpur: Principal Tushar Nerkar, Engineer Madhav Patil, Administrative Officer Sanjay Haswani, Sangeeta Devare and office bearers during the inauguration of Triple R Center of the municipality
Dhule Municipal Corporation : 10 दिवसांत 2 हजार हरकती दाखल

स्वयंसेवकांचा पुढाकार

पालिकेच्या स्वच्छता अभियानाचा महत्त्वाचा उपक्रम असलेल्या ट्रिपल आर केंद्रासाठी व वस्तू संकलनासाठी विविध प्रभागातून स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. त्यात माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, मीनाक्षी राठी, दिव्या जैन, अनिल पाटील, भालेराव माळी आदींचा समावेश आहे. ट्रिपल आर केंद्रासाठी द्यावयाच्या वस्तूंबाबत शहरात स्वयंसेवकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

"घरात नकोशा झालेल्या वस्तू बऱ्याचदा उघड्यावर फेकल्या जातात. त्यामुळे सार्वजनिक कचरा तयार होतो. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन ट्रिपल आर सेंटर उभारले आहे. आपल्या घरात अडगळ होत असलेल्या वस्तू इतरत्र न फेकता आपल्याकडे येणाऱ्या पालिकेच्या वाहनांमध्ये द्याव्यात. त्यांचा पुनर्वापर करणे शक्य आहे. कचरा कमी करणे, शक्यतो पुनर्वापरावर भर देणे आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करून तो वापरण्यायोग्य करणे अशा त्रिसूत्रीद्वारे आपण हळूहळू कचरामुक्तीचे लक्ष्य साध्य करू या."

-भूपेशभाई पटेल

Shirpur: Principal Tushar Nerkar, Engineer Madhav Patil, Administrative Officer Sanjay Haswani, Sangeeta Devare and office bearers during the inauguration of Triple R Center of the municipality
Dhule Crime News : नाशिक, शिरपूरच्या चोरट्यांना 6 दुचाकींसह अटक; शिरपूर शहर पोलिसांच्या शोधपथकाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com