Nandurbar News : मृत सहकाऱ्याच्या कुटुंबीयांचे पोलिस दलाने पुसले अश्रू; स्वेच्छेने 4 लाख 65 हजार रुपयांची मदत

While handing over the relief fund check to the family of the deceased police officer by the district police force, P. R. Patil. Neighbors Nilesh Tambe, Vishwas Valvi, Kiran Kumar Khedkar, Narendra Bhadane, Gaukul Autade, Rajendra Jagtap, Rahul Kumar Pawar.
While handing over the relief fund check to the family of the deceased police officer by the district police force, P. R. Patil. Neighbors Nilesh Tambe, Vishwas Valvi, Kiran Kumar Khedkar, Narendra Bhadane, Gaukul Autade, Rajendra Jagtap, Rahul Kumar Pawar.esakal

Nandurbar News : जिल्हा पोलिस दलातील तळोदा पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांचा १८ जुलैला २०२३ ला नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ अपघात झाल्याने मृत्यू झाला होता.

त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा पोलिस दलातर्फे मदतीचा धनादेश गुरुवारी (ता. २) देण्यात आला.( helping hand to family of police officer who died in accident from police department dhule news )

अपघातामुळे सावळे यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे तातडीने सुरत येथील युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. औषधोपचारासाठी सावळे यांना तातडीची मदत म्हणून जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी स्वेच्छेने वर्गणी जमा करून एक लाख ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली होती; परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

२२ जुलैला निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबासाठी जिल्हा पोलिस दलाकडून स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले होते. या आवाहनास पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सावळे यांच्या परिवाराकरिता तीन लाख ३५ हजार रुपये एवढा मदत निधी अल्पकाळात जमा केला. पोलिस अधीक्षकांनी सर्वप्रथम स्वत:तर्फे मदतनिधी दिला.

While handing over the relief fund check to the family of the deceased police officer by the district police force, P. R. Patil. Neighbors Nilesh Tambe, Vishwas Valvi, Kiran Kumar Khedkar, Narendra Bhadane, Gaukul Autade, Rajendra Jagtap, Rahul Kumar Pawar.
Nandurbar News : हातोडा तापी पाणीपुरवठा योजना; तळोद्यात पाइपलाइन टाकण्याच्या कामाला वेग

या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे, पोलिस निरीक्षक गौकुळ औताडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप, तळोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार उपस्थित होते.

कुटुंबीयांना अश्रू अनावर

पोलिस दलाकडून जमा करण्यात आलेल्या मदत निधीचा धनादेश मृत अंमलदार सावळे यांच्या कुटुंबीयांना गुरुवारी पोलिस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रदान करण्यात आला. अशा प्रकारे स्वेच्छेने चार लाख ६५ हजार रुपयांची मदत दिली आहे. मदत निधीचा धनादेश स्वीकारताना सावळे यांची मातोश्री उषाबाई सावळे व पत्नी प्रतिभा सावळे यांना अश्रू अनावर झाले.

While handing over the relief fund check to the family of the deceased police officer by the district police force, P. R. Patil. Neighbors Nilesh Tambe, Vishwas Valvi, Kiran Kumar Khedkar, Narendra Bhadane, Gaukul Autade, Rajendra Jagtap, Rahul Kumar Pawar.
Nandurbar News : जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी; कायदेशीर कारवाई होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com