अटल महाआरोग्य शिबीरात एक लाखावर रुग्णांची ऐतिहासिक नोंदणी

Historical registration of one lakh patients in Atal Maha Arogya Shibir
Historical registration of one lakh patients in Atal Maha Arogya Shibir

देऊर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा लाभ क्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील अटल मैदानावर आयोजित अटल महाआरोग्य शिबिरात तब्बल 1 लाख 18 हजार रुग्णांची तपासणी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. यात आलेल्या रुग्णांच्या नोंदणी करण्याचे काम जिल्ह्यातील सातशे वीस शिक्षकांवर होती. ही ऐतिहासिक नोंदणी करण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे. 

सदर शिबिराचा महत्त्वाचा विभाग - रुग्ण नोंदणी ही शिक्षण विभागाची जबाबदारी होती. महाआरोग्य शिबिरात धुळे गटातील 500 जिल्हा परिषद शिक्षक व महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शिक्षक व खाजगी प्राथमिक शिक्षक 220 त्यांचे 94 पथक त्यावर तेवढेच केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पथक प्रमुख म्हणून कामकाज केले. यासाठी शिक्षण विभागाने उत्तम नियोजन केल्या बद्दल शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मनपा प्रशासन अधिकारीसह इतर सर्व अधिकारी यांचे आभार सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर नाईक यांनी जाहीररित्या मानले. 

आजच्या शिबिरासाठी सलग दोन दिवसापासून मेहनत घेतलेल्या शिक्षक, अधिकारी यांना सहभाग व योगदानाबद्दल मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र नंतर देण्यात येणार आहे.

महाआरोग्य  शिबीरातील रुग्णतपासणी अंती 27 हजार 638 रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी संदर्भीत करण्यात आले, तर 1898 मोतीबिंदू साठी, 2955 चष्मे, 193 दातांच्या कवळ्या, 1123 कृत्रिम अवयव, 5370 दातांचे रुग्ण, 11989 डोळ्याचे रुग्ण, 607 लठ्ठपणा, 451 सिकलसेल/ थॅलेसेमिया रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे.

अटल महाआरोग्य शिबीरात 94 ओ. पी. डी. कार्यरत होत्या तर यासाठी 1768 डॉक्टरांची टीम रुग्ण तपासणीच्या कामात लागली होती. 1540 पॅरामेडीकल स्टाफ, 5700 अशासकीय स्वयंसेवक, 2100 शासकीय स्वयंसेवक या सर्वांच्या मेहनतीने आजचे धुळे जिल्ह्यातील महाआरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी मोठी मदत झाल्याचेही आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com