धुळे- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस. जी. शेख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.