esakal | पाच वर्षांनी एकमेकांना दिले आलिंगन..उपस्थितांच्या डोळ्यात आले पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

पाच वर्षांनी एकमेकांना दिले आलिंगन..उपस्थितांच्या डोळ्यात आले पाणी 

ठाणे क्राइम ब्रँचच्या मुस्कान ऑपरेशनअंतर्गत सापडला. त्यापूर्वी पालकांनी तो हरविल्याची, त्याचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली होती.

पाच वर्षांनी एकमेकांना दिले आलिंगन..उपस्थितांच्या डोळ्यात आले पाणी 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः ऑपरेशन मुस्कानअंतर्गत खडतर पाच वर्षांनी आणि येथील बालकल्याण समितीच्या प्रयत्नांती पिता-पुत्राची पाच वर्षांनी येथे भेट झाली. त्यामुळे त्यांना गहिवरून आले. देऊन भावनांना वाट मोकळी करून दिली. तो प्रसंग बालकल्याण समिती सदस्यांचा मन हेलावून गेला. 


मुस्कान ऑपरेशनअंतर्गत ठाणे क्राइम ब्रँचतर्फे भिवंडी येथील गतिमंद अकबरअली मन्सुरी (वय १७) वाशीम बालकल्याण समितीसमोर दाखल झाला. नंतर तो धुळे बालकल्याण समितीसमोर उपस्थित झाला. त्याची काळजी व संरक्षणाची गरज लक्षात घेता त्याला बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड यांनी शिरपूर येथील बापूसाहेब एन. झेड. मराठे विधायक संस्थेच्या अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात दाखल करण्याचा आदेश दिला. 

असे झाले ऑपरेशन मुस्कान

अकबरअली २०१५ पासून हरवला होता. तो यवतमाळ बालकल्याण समितीसमोर २०१७ मध्ये दाखल झाला. तेथून कवठा मतिमंद शाळेत २०१९ दाखल झाला. तेथूनही तो हरवला आणि ठाणे क्राइम ब्रँचच्या मुस्कान ऑपरेशनअंतर्गत सापडला. त्यापूर्वी पालकांनी तो हरविल्याची, त्याचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानुसार पोलिस तपास सुरू होता. ठाणे पोलिसांनी धुळे बालकल्याण समितीशी संपर्क साधत अकबरअलीची कागदपत्रे पाठविली. त्याआधारे बालकल्याण समितीने तपासणी केली. आधारकार्ड नसल्याने तपासात अडसर निर्माण होत होता. त्याचे आधारकार्ड काढले. नंतर त्याचे पालक येथे उपस्थित झाले.

पाच वर्षांनी झाली भेट

अकबरअली आणि वडील मजहरअली मन्सुरी यांनी पाच वर्षांनी एकमेकांना पाहिले. त्यांनी आनंदाने मिठी मारत आनंद व्यक्त केला. बालकल्याण समितीच्या आदेशाने अकबरअलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. धुळे बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. दुसाने, प्रा. सौ. पाटील, ॲड. मंगला चौधरी, शिरपूर मतिमंद बालगृहाचे मुख्याध्यापक गणेश निकुंभ, लिपिक विवेक वाघ, अधीक्षक योगेश दाभाडे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे जगदीश झिरे, तृप्ती पाटील, अश्विनी देसले, रोहिदास अहिरे आदी उपस्थित होते.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image