पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला प्रधान जिल्हा न्यायधीश एम. एम. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

नाशिक - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला प्रधान जिल्हा न्यायधीश एम. एम. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अंबादास मुरलीधर देसाई (वय ६०, रा. विष्णुनगर, म्हसोबा मंदिराजवळ, स्टेशनवाडी, नाशिक रोड) असे आरोपीचे नाव असून, ही घटना २१ एप्रिल २०१७ रोजी घडली होती. शोभा अंबादास देसाई (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी अंबादास देसाई हा नेहमीच पत्नी शोभा यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband life imprisonment in the case of wife murder