
''मला खूप टेन्शन आलयं'' अस म्हणत त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला अन्...
धुळे : मला खूप टेन्शन आहे, शेवटचे पाहून घे, असे व्हिडीओ कॉलद्वारे पत्नीशी बोलून पती बेपत्ता झाला. प्रभाकर देवचंद चौधरी (वय ५४, रा. सूर्यानगर, वलवाडी शिवार, देवपूर) असे त्यांचे नाव आहे. ते गुरुवारी सकाळी सातला देऊर (ता. धुळे) येथे शाळेत जात असल्याचे पत्नी सुनीला यांना सांगत घरातून बाहेर पडले. नंतर त्यांची पत्नीही बिलाडी येथील शाळेत गेली.
प्रभाकर चौधरी यांनी पत्नीला सकाळी साडेअकराला व्हिडीओ कॉलने ‘मला खूप टेन्शन आहे, आता तू शेवटचे पाहून घे’, असे सांगितले. नंतर त्यांनी सायंकाळी नाशिक येथील मुलीला फोन करून तु तुझी काळजी घे, भावाला नीट सांभाळ, मी काय घरी परत येणार नाही, असे बोलून फोन कट केला. त्यामुळे कुटुंबीयांनी परिसरासह मित्र, नातेवाईकांकडे शोध घेऊनही ते आढळले नाही. या प्रकरणी सुनील चौधरी यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यास माहिती दिली.
हेही वाचा: एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी केलं शंभूराज देसाईंचं अभिनंदन; असं नेमकं काय घडलं?
हेही वाचा: Video: पोलीस बॉयफ्रेंडनं केला विश्वासघात! एसपींनी 'ऑन द स्पॉट' लावला निकाल
Web Title: Husband Missing After Video Call With His Wife In Dhule News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..