Dhule Fire Accident : आगीत शेतकऱ्याचा संसार खाक

hut caught fire in field and 70000 rupees worth of cash got burnt
hut caught fire in field and 70000 rupees worth of cash got burnt esakal

Dhule News : बोरगाव (ता. शिरपूर) शिवारात शुक्रवारी (ता. २१) सकाळी शेतात झोपडीला आग लागून ७० हजार रुपयांच्या रोकडसह धान्य व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शेतकऱ्याच्या शेळीसह कोंबड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आपत्तीमुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. (hut caught fire in field and 70000 rupees worth of cash got burnt dhule news)

विक्रम नाना पावरा (वय ४८) यांच्या झोपडीला सकाळी आग लागली. ते शेतात एका बाजूला लेव्हलिंग करण्यात गुंतले होते. त्यांचे कुटुंब शेजारच्या शेतात निंदणी करीत होते. झोपडीतून धूर येताना दिसताच सर्वांनी तिकडे धाव घेतली.

मात्र लाकडी वासे, कुडाची झोपडी असल्याने आग पसरली. त्यात वाराही वाहत असल्याने आगीने वेग पकडला. परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु संपूर्ण झोपडीची राख झाल्यावरच आग आटोक्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

hut caught fire in field and 70000 rupees worth of cash got burnt
Dhule Wax Factory Fire : होरपळलेल्या 5 महिलांच्या मृत्यूचे गूढ कायम

विक्रम पावरा यांनी झोपडीतील सूटकेसमध्ये ठेवलेले रोख ७० हजार रुपये जळून गेले. झोपडीतील १० क्विंटल गहू, आठ क्विंटल कापूस, तीन क्विंटल हरभरा, ८० किलो सोयाबीन जळून खाक झाले. एक शेळी व पाच कोंबड्याही आगीच्या भक्ष्य ठरल्या.

विक्रम पावरा मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. काही वर्षे दुसऱ्यांकडे सालदारी केल्यावर पाच वर्षांपूर्वी त्यांनी हिंगोणी (ता. शिरपूर) येथील गोपाल पाटील या शेतकऱ्याकडून शेत कसण्यासाठी करारावर घेतले आहे. आगीनंतर विक्रम पावरा यांच्या पत्नीने केलेला आक्रोश ऐकून उपस्थितांची मने हेलावली.

कष्टकरी कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सरपंच योगेंद्रसिंह सिसोदिया, पोलिसपाटील मनोहर पाटील, तलाठी रेणुका राजपूत, हवालदार रवींद्र आखडमल आदींनी घटनास्थळी भेट दिली. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज आहे.

hut caught fire in field and 70000 rupees worth of cash got burnt
Nandurbar News : शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी महावितरणचे प्राधान्य; वर्षभरात सर्वाधिक कनेक्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com