Nandurbar News : शेतकऱ्यांच्या खर्चातून रस्त्याचे काम; प्रशासनाचे दुर्लक्ष

Farmers making farm road with JCB machine at own expense.
Farmers making farm road with JCB machine at own expense. esakal

Nandurbar News : दरा फाटा (ता. शहादा) येथील सुसरी धरणातील बॅक वॉटर पावसाळ्यात थेट गोदिपूर ते नवलपूर रस्त्यावर येत असल्याने हा रस्ताच दर वर्षी गायब होत आहे. (Ignoring demand angry farmers took out loans and started building road directly nandurbar news)

शेतकऱ्यांना शेतात अधिकचा फेरा मारून पायी जावे लागत असल्याने वारंवार रस्त्यांबाबत मध्यम प्रकल्पाचे अभियंता, तहसीलदार यांच्याकडे मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कर्ज काढून थेट रस्ता तयार करण्यास सुरवात केली आहे. तरीही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील सुसरी प्रकल्प तयार होण्यापूर्वी गोदीपूरहून नवलपूर कडे जाणारा शिवरस्ता शासनाचा नकाशावर वास्तव्यात होता. या रस्त्यावरून शेतकरी नेहमी ये जा करीत होते. परंतु, सुसरी प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर संबंधित ठेकेदारांसह मध्यम प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी रस्त्याबाबत योग्य नियोजन न केल्याने गोदीपूर - नवलपूर शिव रस्ताच पावसाळ्यात गायब होत असल्याने दोन गावांचा संपर्कच तुटतो.

यामुळे शेतकऱ्यांना देखील उत्पादित शेतमाल काढण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. गोदीपूर ते नवलपूर रस्तालगत सुसरी धरण आहे. या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील पाणी थेट रस्त्यावर येते. शेतकऱ्यांना पायी चार किलोमीटरचा फेरा मारून शेत माल काढावा अथवा शेतीकामे करावे लागत असते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Farmers making farm road with JCB machine at own expense.
Dhule News : नवीन शौचालये सुरू न करण्यामागे काय इंटरेस्ट? सार्वजनिक शौचालयांचा प्रश्‍न

पाच लाख वर्गणीतून काम

रस्ता धरणालगत असल्याने धरणातील फुगवट्याचे पाणी येत असल्याने याठिकाणी धरण लगत उंच संरक्षण भिंत बांधून हा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी सुसरी धरण लगत असलेल्या शेतकऱ्यांनी वारंवार मध्यम प्रकल्प कडे केली. परंतु रस्त्याबाबत मध्यम प्रकल्पाचे दुर्लक्ष झाल्याने थेट शेतकऱ्यांनी कर्ज काढून वर्गणी करून चार ते पाच लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात येत आहे. तरी देखील मध्यम प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

रस्त्याची वर्षभराआधी मोजणी...

सुसरी धरणालगत असलेला रस्ता बंद झाल्याने रस्ता नवीन तयार करून शेतकऱ्याचे हाल थांबवावे यासाठी शेतकरी मुरलीधर पाटील, मेघराज पाटील, रमेश पाटील, गोपाळ पाटील, दिनेश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील यांच्या मार्फत आमदार राजेश पाडवी, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तू. प्र. चिनावलकर यांना निवेदन दिले.

याची दखल घेत कनिष्ठ अभियंत्यांनी सुसरी प्रकल्पात येऊन गोदीपूर - नवलपूर रस्त्याची मोजणी केली. परंतु, मोजणी होऊन वर्ष लोटले तरीही मध्यम प्रकल्प कडून काहीही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कर्ज काढून रस्ता तयार करण्याचे ठरविले. रस्ते कामास सुरवात झाल्यानंतरही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Farmers making farm road with JCB machine at own expense.
Market Committee Election : बाजार समितीच्या मैदानात लोकसभा, विधानसभेची पेरणी; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com