
धुळे : जनावरांची अवैध वाहतूक करणारे ताब्यात
साक्री (जि. धुळे) : तालुक्यातील बेहेड गावाच्या शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही वाहनांसह तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही वाहनातून १८ म्हशी ताब्यात घेण्यात आल्या. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील बेहेड-धमणार या रस्त्यावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दोन आयशर कंपनीचे वाहनाद्वारे जनावरांची वाहतूक करताना आढळून आले. ललित संजय गवळी (रा. गवळीवाडा ता. साक्री) यांनी फोनवरून पोलिसांना माहिती दिली. त्यांच्यासोबत असणारे वैभव रवींद्र भिंगारे, रुपेश शरद वानखेडे, नागेश राजेंद्र निकम.(सर्व रा. साक्री) यांनी हे दोन्ही वाहन थांबबून वाहनचालकांना विचारपूस केली. त्यांनी वाहनांची पाहणी केली असता वाहनामध्ये जनावरे आढळून आली. (जीजे ०६ एटी ०१७५), (जीजे ०६ एएक्स २९२३) दोन्ही वाहन साक्री येथील पोलिस स्टेशन येथे जमा केलेत. त्यानंतर साक्री पोलिसांनी तपासणी केली असता वाहनचालक मकरानी करामत अली अहमद अली (वय ३९ रा. राजगड जिल्हा पंचमहल गुजरात) व रिजवान रज्जाक खान पठाण (वय २१ रा. जमादार फलिया सेलंबा जिल्हा नर्मदा गुजरात) या दोघांबिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: अवैध बायोडिझेलची जोमाने विक्री; विक्रेत्यांना अभय कोणाचे?
हेही वाचा: प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेसाठी विधवा महिलेची फरफट
Web Title: Illegal Animal Traffickers Arrested Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..