Dhule Crime : वाहनासह 6 लाखांची अवैध देशी दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhule crime

Dhule Crime : वाहनासह 6 लाखांची अवैध देशी दारू जप्त

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर (ता. धुळे) पोलिसांनी एका वाहनातून अवैध देशी दारूचे तीस खोके जप्त केले. एक लाख सहा हजारांची दारू व पाच लाखांचे वाहन असा सहा लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दोन संशयितांचा शोध सुरू आहे. (illegal liquor worth 6 lakh seized along with vehicle by police dhule crime news)

शिरपूरकडून धुळ्याकडे एका वाहनातून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सोनगीर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यानुसार पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावर सापळा रचला. शिरपूरकडून संशयित वाहन (एमएच ४८, एफ ४५६८) पोलिसांनी थांबवून चालकाला ताब्यात घेतले.

वाहनांची तपासणी केली. वाहनात देशी दारूचे ३० खोके आढळले. याबाबत संशयित चालक नरेंद्र कोळी (रा. खामखेडा, ता. शिरपूर) याच्यासह अन्य दोघांविरोधात सोनगीर पोलिसांत गुन्हा दाखल केला. उर्वरित दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Police Recruitment : पडताळणीनंतर पोलिस भरतीत 12 हजार 266 उमेदवार पात्र

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह रवींद्र महाले, संजय देवरे, अमरिश सानप, विजयसिंग पाटील, सूरजकुमार साळवे, राकेश ठाकूर, किरण पारधी यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: Dhule News : 5 कोटींच्या गार्डनचा उद्‍घाटनापूर्वीच सत्यानाश; शिवसेनेचा आरोप कोणावर?