illegal sand transport
illegal sand transportsakal

Jalgaon News : जळगावात सरकारी कामात अडथळा; कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव

Tractor Driver Escapes as Local Aids Illegal Transport : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असताना दुचाकीवरून आलेल्या देवीदास बबन ढेकळे याने मंडळ अधिकाऱ्यांच्या दुचाकीचा पाठलाग करीत थांबविले.
Published on

जळगाव- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असताना दुचाकीवरून आलेल्या देवीदास बबन ढेकळे (रा. आदर्शनगर) याने मंडळ अधिकाऱ्यांच्या दुचाकीचा पाठलाग करीत थांबविले. त्यांच्या दुचाकीची चावी काढून ट्रॅक्टरचालकाला पळून जाण्यास मदत केल्याची घटना रविवारी (ता. १३) सकाळी साडेनऊला मोहाडी रस्त्यावर घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com