Thur, June 8, 2023

Dhule News: दापुरा-दापुरी येथे वीजपंपांच्या वीजवाहिनी चोरीने शेतकरी त्रस्त
Published on : 20 March 2023, 1:29 pm
सोनगीर : दापुरा व दापुरी शिवारात भुरट्या चोरट्यांची संख्या वाढली असून, शेतातील इलेक्ट्रिक वायर व काही प्रमाणात मोटारपंप चोरी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडासह शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. याबाबत दापुरा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल विश्राम पाटील यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.
गुरुवारी (ता. १६) रात्री आठ ते शुक्रवारी (ता. १७) सकाळी सहाच्या दरम्यान शेतातील विहिरीवरील तीन ते साडेतीन हजार रुपये किमतीची वीजपंपाला जोडलेली इलेक्ट्रिक वायर चोरीस गेल्याचे दिसून आले. शिवाय शेजारील अन्य शेतकऱ्यांच्या विहिरीवरील वायर चोरीस गेल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर चोरांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी केली.