Latest Dhule News| कुसुंबा कळंबेश्वर मंदिरात 25 फूट त्रिशुलाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

25 feet trishul

Dhule : कुसुंबा कळंबेश्वर मंदिरात 25 फूट त्रिशुलाचे लोकार्पण

कुसुंबा (जि. धुळे) : येथील पुरातन काळातील श्री क्षेत्र कळंबेश्वर मंदिरास श्रावण मासानिमित्त २५ फूट त्रिशुलाचे लोकार्पण करण्यात आले. (Inauguration of 25 feet Trishula at Kusumba Kalambeshwar Temple Latest Dhule News)

हेही वाचा: Nashik : पूर्व विभागीय कार्यालयाने नाकारली 121 मंडळांना परवानगी

येथील एम. के. शिंदे विद्यालयाचे उपशिक्षक मनोहर शिंदे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून साकारलेला त्रिशुल श्री क्षेत्र कळंबेश्वर मंदिरास श्रावणमासा निमित्त भेट देण्यात आला आहे. त्रिशुलाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी विश्वनाथ शिरुडे, प्रा. डॉ. दत्ता परदेशी, प्रा. श्यामकांत शिंदे, संजय शिंदे, प्रा. अमोल शिंदे, रामलाल परदेशी, पी. पी. परदेशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्रिशुलास विलास पांचाळ, कैलास पांचाळ यांनी मूर्त स्वरूप दिले आहे. तर महादेव भक्त दिनेश राजभोज यांच्या सूचकतेनुसार साकारले आहे. त्रिशुलाचे वजन दोन क्विंटल आहे. यावेळी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा: नाशिक : रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला केली बेदम मारहाण

Web Title: Inauguration Of 25 Feet Trishula At Kusumba Kalambeshwar Temple Latest Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..