Nandurbar News : दिवाळीची लक्ष्मी पावली, एसटी भरधाव धावली..!

st bus
st bus sakal

Nandurbar News : दिवाळी पर्व आले की बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यातूनच लालपरीने प्रवास करण्यास प्रवाशांनी प्रतिसाद दिल्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात भर पडते.

या वर्षी दिवाळी सणाच्या दहा दिवसांत प्रवाशांच्या प्रतिसादामुळे नंदुरबार आगाराने रेकार्ड ब्रेक उत्पन्न घेतले. (income increase of State Transport Corporation in diwali vacation dhule news)

या दहा दिवसांच्या कालावधीत नंदुरबारात राज्यपालांचा कार्यक्रम, धुळ्यात शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा कथा सप्ताह, तर दिवाळीचा हंगाम या तिहेरी संगम पर्वणीने नंदुरबार आगाराच्या तिजोरीत उत्पन्नाची मोठी भर पडली आहे. सुमारे दोन कोटी ५१ लाख ५२ हजार ५५१ रुपयांची कमाई नंदुरबार आगाराने करून दहा दिवसांत उत्पन्न घेतल्याचा विक्रम नोंदविला आहे, अशी माहिती आगारप्रमुख संदीप निकम यांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सर्वसामान्यांसाठी सोयीची आहे म्हणून सण-उत्सव काळात लालपरीने प्रवास करण्यास प्रवाशांची पसंती असते. या वर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराने दिवाळी हंगामात बसफेऱ्या वाढवून केवळ दहा दिवसांत दोन कोटी ५१ लाख ५२ हजार ५५१ रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

दीपावली पर्व, धुळे येथे शिवकथाकार पंडित मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सप्ताह आणि नंदुरबारात जनजाती गौरव सोहळ्यानिमित्त राज्यपालांचा आयोजित कार्यक्रमासाठी नंदुरबार आगारातून बस पाठविण्यात आल्या. यामुळे दिवाळीच्या हंगामात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आणि इतर दोन्ही इव्हेंटमुळे नंदुरबार आगाराच्या उत्पन्नात भर पडली आहे. परिवर्तन, शिवशाही, मिनी अशा सर्व बस फेऱ्यांवर पाठविण्यात आल्या.

नंदुरबारात राज्यपालांच्या कार्यक्रमासाठी ४० बस, तर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा सप्ताहानिमित्त धुळे येथे दिवसाला २८ बसच्या फेऱ्या सुरू होत्या. या तिन्ही मोठ्या संधींचे सोने नंदुरबार आगाराने नियोजनबद्ध पद्धतीतून करून तिजोरीत उत्पन्नाची भर पाडली. नंदुरबार आगाराच्या बस तितक्याच; परंतु त्याच बसच्या फेऱ्या वाढवून जास्तीचे उत्पन्न मिळविण्यास यश आले आहे.

st bus
Nandurbar News : गावातच मिळणार हक्काचा रोजगार : डॉ. विजयकुमार गावित

अवघ्या दहा दिवसांत दोन कोटी ५१ लाख ५२ हजार ५५१ रुपयांचे उत्पन्न नंदुरबार आगाराने मिळविले आहे. १९ नोव्हेंबरला पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा सप्ताहाच्या धुळे येथे अखेरच्या दिवसामुळे त्या एकाच दिवशी तब्बल २७ लाख उत्पन्न सवलतीसह मिळाले. दिवाळीच्या हंगामात १५ लाख ५७ हजार इतका उत्पन्नाचा फायदा मिळाला.

प्रवाशांची लालपरीला पसंती

नेहमीच्या ३४ हजार किलोमीटर फेऱ्यांमध्ये रोज वाढ करून तब्बल ४९ हजार किलोमीटर फेऱ्या केल्याने दोन लाख ७९ हजार ५३३ प्रवाशांनी लालपरीने प्रवास करण्यास पसंती दिल्याने अडीच कोटींचे उत्पन्न नंदुरबार आगाराच्या तिजोरीत आले.

दिवाळीच्या हंगामात जादा बसद्वारे १० ते २० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल चार लाख ३१ हजार ५५० किलोमीटर अंतराच्या फेऱ्या झाल्याने एक कोटी ५२ लाख ८५ हजार ५५६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. अवघ्या दहा दिवसांत नंदुरबार अगाराने अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे रेकॉर्ड केले.

st bus
Nandurbar News : 14 भाडेपट्टाधारक थकबाकीदारांना नोटीस; भाडेवसुलीसाठी तळोदा पालिका सरसावली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com