धुळे- महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत विविध प्रयोजनार्थ देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्र, मंडप फी, परवानगी फी आदींमध्ये दहा वर्षांनंतर वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासकीय महासभेने घेतला. तसेच, पाणी विक्री दरही वाढविण्यात आले. दरम्यान, शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी मागणी केल्यानुसार स्वखर्चाने शहरात पाच ठिकाणी आरओ प्लांटसाठी जागा उपलब्ध करण्यासही मंजुरी देण्यात आली. या आरओ प्लांटमधून नागरिकांना फक्त एक रुपयात एक लिटर पाणी देण्यात येणार आहे.