राहता: येथील सेंट जॉन स्कूलमध्ये नुकताच ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिमाखदार ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तालबद्ध मार्च पास्ट सादर करत उपस्थितांची मने जिंकली.