Dhule ZP News : मिशन संवेदनातून दिव्यांगांच्या जीवनात रंग भरणार; शुभम गुप्ता यांचा पुढाकार

Dhule ZP News : मिशन संवेदनातून दिव्यांगांच्या जीवनात रंग भरणार; शुभम गुप्ता यांचा पुढाकार

Dhule ZP News : दिव्यांगांच्या जीवनात रंग भरू शकते, असा दृढ विश्‍वास व्यक्त करत येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी पुढाकाराने आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या भक्कम साथीने राज्यासाठी पथदर्शी ठरेल, असा हा प्रकल्प अमलात आणण्यास सुरवात केली आहे.(Initiative of Shubham Gupta in mission samvedna for disabled person dhule news)

मिशन संवेदनांतर्गत दहासूत्री कार्यक्रम हाती घेत दिव्यांग बांधवांबाबत चर्चा व्हावी आणि त्यातून त्यांच्याविषयी जागरूकता वाढावी या उद्देशाने सीईओ गुप्ता यांनी जिल्हाधिकारी गोयल यांच्या बहुमोल सहकार्याने विधायक पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

असे सुचले मिशन?

राज्य शासनातर्फे येथे जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी असे अभियान राबविण्यात आले. हा कार्यक्रम कसा राबवावा याविषयी श्री. गोयल व गुप्ता यांच्यात चर्चा सुरू होती. यानिमित्ताने जिल्ह्यातील दिव्यांगांना एकत्रित करतो आहोत.

याअनुषंगाने या घटकासंबंधी विविध संस्था, संघटनांशी झालेल्या चर्चेतून विविध अडीअडचणी, समस्या पुढे आल्या. सर्वंकष विचार करता दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन संवेदना राबवावे, त्यांना निरनिराळे लाभ द्यावेत यासाठी दहासूत्री कार्यक्रम अमलात आणण्याचे ठाणले.

त्यानुसार दोन आठवड्यांतच समाजकल्याण अधिकारी मनीष पवार यांच्याशी चर्चा करीत मिशन संवेदना राबविण्याबाबत दहा टप्पे व आराखडा तयार केला आणि मनातील संकल्पना अमलात आणण्यास सुरवात केली आहे, असे सीईओ गुप्ता यांनी सांगितले.

Dhule ZP News : मिशन संवेदनातून दिव्यांगांच्या जीवनात रंग भरणार; शुभम गुप्ता यांचा पुढाकार
Dhule ZP News : केंद्रप्रमुखपदाच्या किमान पात्रतेत बदल ; सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे होणार निवड

प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण

मिशन संवेदनांतर्गत सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण आशा वर्करच्या माध्यमातून करण्याचे ठरले. त्यासाठी शिरपूरहून सुरवात झाल्यावर चारही तालुक्यांत प्रशिक्षण देण्यात आले. महात्मा गांधी सेवा संघाचे कृष्णा शिरसाट, सागर कान्हेकर उपस्थित होते.

मानधनाच्या लाभातून आशा वर्कर या दिव्यांगस्नेही म्हणून सर्वेक्षण करतील. दिव्यांगांचे घरोघरी सर्वेक्षण केले जाईल. दहासूत्री कार्यक्रमातील पहिल्या टप्प्यात आशा वर्कर महात्मा गांधी सेवा संघाने तयार केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सर्वेक्षण करतील आणि नंतर उपलब्ध माहितीनुसार पुढील नऊ टप्प्यांचे कामकाज सुरू होईल.

मिशन संवेदनाचा उद्देश दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे. सर्वेक्षणात दिव्यांग असलेले शिशू, बालके, युवक, तरुण, प्रौढ, वृद्ध महिला, पुरुष, तृतीयपंथी घटकास समाविष्ट केले जाईल. पुढे त्यांची आरोग्य विभागाकडून खातरजमा केली जाईल.

''या प्रक्रियेतून २१ प्रकारच्या दिव्यांगांना व जे वैश्‍विक ओळखपत्राच्या (यूडीआयडी) नोंदणीतून, योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यांचाही सर्वेक्षणात समावेश केला जाईल. सर्वेक्षण प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे.'' -शुभम गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद, धुळे

Dhule ZP News : मिशन संवेदनातून दिव्यांगांच्या जीवनात रंग भरणार; शुभम गुप्ता यांचा पुढाकार
Dhule ZP News : दोंदवाडचे विद्यार्थी, ग्रामस्थ थेट झेडपीत; चार वर्षांपासून शिक्षकाचा शोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com