Dhule ZP News : दोंदवाडचे विद्यार्थी, ग्रामस्थ थेट झेडपीत; चार वर्षांपासून शिक्षकाचा शोध

Along with the students of Dondwad while protesting teachers' question in Zilla Parishad Gram panchayat office bearers and Prof. Sharad Patil.
Along with the students of Dondwad while protesting teachers' question in Zilla Parishad Gram panchayat office bearers and Prof. Sharad Patil.

Dhule ZP News : दोंदवाड (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि काही ग्रामस्थ मंगळवारी (ता. १०) थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. चार वर्षांपासून या शाळेत नियुक्त शिक्षकाचा शोध घेतला जात आहे.

संबंधित शिक्षक दरमहा वेतनाचा लाभ अचूकपणे पदरात पाडून घेत आहे; परंतु विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी शिक्षकासह यंत्रणेला चिंता नाही, अशी व्यथा मांडत लहानग्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीतून प्रशासनाचे लक्ष वेधले.

वाऱ्यावर शाळा असलेल्या दोंदवाडच्या उपसरपंच गंगूबाई माळी, माजी सरपंच संजय बनसोडे, ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र बिऱ्हाडे, धर्मा माळी, देवीदास मिस्तरी, पंडित वाघ, भय्या देवरे, विमलबाई सोनवणे, संजय माळी, भाऊसाहेब पाटील, बापूराव बोरसे, अनिल माळी, विजूबाई माळी, ललिता माळी आणि ७५ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या आवारात दाखल झाले. त्यांना माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची साथ लाभली. (no teacher in dhule zp school news)

दरमहा वेतनासाठी शाळेत

बोरी पट्ट्यातील दोंदवाड जिल्हा परिषद शाळेत तीन शिक्षकांची नेमणूक आहे. पैकी एक शिक्षक प्रशासकीय कामाच्या नावाखाली शाळेत नसतो. त्यात आणखी एक शिक्षिका जयश्री दाभाडे यांचा चार वर्षांपासून शोध घेतला जात आहे. त्यांनी चार वर्षांत एक अक्षरही शिकविले नाही, अशी तक्रारकर्त्यांची कैफियत आहे.

शाळेत यायचे नाही, मात्र संबंधित शिक्षिका दरमहा वेतन अचूकपणे पदरात पाडून घेण्यासाठी कशी काय उपस्थित राहाते? नंतर पुन्हा ती काढता पाय घेते. या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे नियमित शिक्षक नेमणुकीबाबत मागणी केली; परंतु दखल घेतली जात नाही किंवा शिक्षण कार्यालयाची दिशाभूल केली जात असल्याची तक्रारही उपस्थित आंदोलकांनी केली.

योग्य मागणीला खो

शाळेत ७० विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक दिले जातात, असा शिक्षणाधिकाऱ्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात दोंदवाडच्या शाळेत ७५ विद्यार्थी आहेत. असे असतानाही तांत्रिक कारणे पुढे करून विद्यार्थी व ग्रामस्थांच्या योग्य मागणीला खो दिला जात असल्याची तक्रारही ग्रामपंचायत सदस्य बिऱ्हाडे यांनी केली.

ते म्हणाले, की दोंदवाड जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, तीन शिक्षकांची नेमणूक आहे. एक शिक्षक प्रशासकीय कामकाजाच्या नावाखाली जिल्हा परिषद किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयात जा-ये करत असतात. त्यामुळे पहिली ते चौथीच्या वर्गांना शिक्षविण्यासाठी एकच शिक्षक उपलब्ध असतो.

Along with the students of Dondwad while protesting teachers' question in Zilla Parishad Gram panchayat office bearers and Prof. Sharad Patil.
Dhule Tomato Rate : द्विशतक ठोकणारा टोमॅटो 10 रुपये किलो; दरात घसरण

शिक्षिका गेली कुठे?

शाळेत ७५ विद्यार्थी शिक्षण घेत असताना संबंधित शिक्षिका चार वर्षांपासून बेपत्ता आहे, असेच म्हणावे लागेल. ती दरमहा वेतनाचा लाभ टळू देत नाही. या स्थितीकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही शिक्षण यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठवड्यात नियमित शिक्षक दिला नाही तर आंदोलन छेडू, असा इशारा श्री. बिऱ्हाडे यांनी दिला.

माजी आमदार प्रा. पाटील म्हणाले, की या जिल्हा परिषद शाळेत गरीब विद्यार्थी आहेत. संबंधित शिक्षिका चार वर्षांपासून शाळेतच येत नाही. मंत्रालयाच्या खास आदेशाने त्या उस्मानाबाद येथे नोकरी करतात. दरमहा वेतन मात्र धुळ्यात घ्यायला येतात. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आहे.

सीईओंकडून दखल...ग्वाही

सीईओ शुभम गुप्ता यांच्या दालनाबाहेरच आंदोलक विद्यार्थ्यांची शाळाही भरली. आंदोलकांची भूमिका जाणून घेत सीईओंनी येत्या आठवड्यात शिक्षक नेमणुकीबाबत ग्वाही दिली. तत्पूर्वी, येत्या आठवड्यात नियमित शिक्षक दिले नाहीत तर आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

Along with the students of Dondwad while protesting teachers' question in Zilla Parishad Gram panchayat office bearers and Prof. Sharad Patil.
Dhule ZP News : केंद्रप्रमुखपदाच्या किमान पात्रतेत बदल ; सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे होणार निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com