चव घेत स्वयंपाक खोलीच्या स्वच्छतेची पाहणी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

जळगाव : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासह अन्य मुद्यांची तपासणी करण्यासाठी पोषण आहाराची केंद्रीय समिती जिल्हा दौऱ्यावर आहे. दहा सदस्यीय समितीने दोन ग्रुपमध्ये विभागणी करून वेगवेगळ्या तालुक्‍यातील शाळांना भेटी देवून तपासणी केली. विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी समितीतील सदस्यांनी पोषण आहाराची चव देखील घेतली. तसेच पोषण आहार बनविण्याच्या स्वयंपाक खोलीतील स्वच्छतेची देखील पाहणी केली. 

जळगाव : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासह अन्य मुद्यांची तपासणी करण्यासाठी पोषण आहाराची केंद्रीय समिती जिल्हा दौऱ्यावर आहे. दहा सदस्यीय समितीने दोन ग्रुपमध्ये विभागणी करून वेगवेगळ्या तालुक्‍यातील शाळांना भेटी देवून तपासणी केली. विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी समितीतील सदस्यांनी पोषण आहाराची चव देखील घेतली. तसेच पोषण आहार बनविण्याच्या स्वयंपाक खोलीतील स्वच्छतेची देखील पाहणी केली. 

शालेय पोषण आहारास वेगवेगळ्या 28 मुद्यांवर तपासणी करण्यासाठी केंद्रीय पोषण आहार समिती रविवारी (ता.2) जळगावात दाखल झाले आहे. समितीमध्ये दहा सदस्य असून, जळगावात आल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहिती घेवून आढावा घेतला. यानंतर आज (ता.3) सकाळपासून प्रत्यक्ष शाळांच्या भेटी घेवून तेथील पोषण आहारासंबंधी रेकॉर्ड तपासणीसह आरोग्याबाबत मुलांकडून देखील माहिती घेतली. समितीचे मुख्य सल्लागार भुपेंद्र कुमार यांच्यासह डॉ. स्वाती ध्रुव, डॉ. यासमीन अली हक, दिनेश प्रधान, विजया भास्कर, सुनील चव्हाण, डॉ. श्रृती कांतावाला, श्‍वेता पटेल, दिव्या पटेल, मयुर राणा हे दौऱ्यावर आहेत. समितीने आज शाळा भेटी देण्यासाठी दोन गुप करून पाहणी केली. भुपेंद्र कुमार यांच्या पथकाने जळगाव, यावल तालुक्‍यातील शाळांना भेटी दिल्या. तर दुसऱ्या पथकाने धरणगाव, चोपडा व अमळनेर तालुक्‍यातील शाळांना भेटी दिल्या. 

पोषण आहारची घेतली चव 
पोषण आहार समितीचे मुख्य सल्लागार भुपेंद्र कुमार यांच्या पथकाने प्रथम जळगाव शहरातील या. दे. पाटील शाळा व महापालिका शाळा क्रमांक 15 या शाळांमध्ये जावून तपासणी केली. यानंतर यावल तालुक्‍यातील अंजाळे, राजोरा व अकलुज येथील जि.प. शाळांना भेटी दिल्या. यात अंजाळे येथील प्रथमिक व माध्यमिक अशा दोन्ही शाळांची तपासणी करून याच ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या पोषण आहाराची चव देखील घेतली. तर दुसऱ्या पथकाने प्रथम धरणगाव तालुक्‍यातील झुरखेडा येथील शाळेत जावून मुलांशी संवाद साधला. यात मुलांना ब्रश करतात का?, दररोज आहारात काय मिळते? यासारखी माहिती विचारूण शाळेतील किचन व परिसराची स्वच्छता पाहिली तसेच वह्यांचा स्टॉक देखील तपासला. यानंतर धरणगावमधील इंदिरा गांधी कन्या शाळा तेथून सावखेडा यानंतर अमळनेर व चोपडा तालुक्‍यात जावून शाळांना भेटी दिल्या. 

समिती येण्यापुर्वी शाळा सज्ज 
शालेय पोषण आहारासंबंधी सर्वाधिक तक्रारी या जिल्ह्यात आहेत. दरवर्षी पोषण आहाराचा मुद्दा गाजत असून, निकृष्ट दर्जाचा मालाचा पुरवठा ही नित्याचीच बाब आहे. याची तपासणी करण्यासाठी समिती आली असून, या समितीच्या हाती काही लागेल की नाही याबद्दल प्रश्‍नचिन्ह आहे. कारण जि.प. शिक्षण विभागाला सोबत घेवून समिती शाळांना भेटी देत असून, समिती येणार असल्याची माहिती शाळांना माहित असल्याने शाळेची पुर्ण स्वच्छता तसेच चांगला पोषण आहार तयार करण्याची सज्जता शाळांची आहे. यामुळे समितीला तशा त्रुटी आढळून येणे अशक्‍य आहे. मुळात समितीने ग्रामस्थ किंवा अन्य कोणाकडून गोपनीयतेने संवाद साधून खरी परिस्थिती जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inspection of kitchen of school at jalgaon