विम्यासाठी मृताला केले जिवंत!

रणजित राजपूत
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

दोंडाईचातील डॉक्‍टराने दिला बनावट दाखला; पोलिसांकडून चौकशी सुरू 
दोंडाईचा - विमा कंपनीच्या दाव्यासाठी मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याच्या नावाने दावा दाखल करीत पैसे उकळण्याचा प्रकार येथे उघड झाला आहे. गुजरातमधील या कंपनीने केलेल्या चौकशीअंती या प्रकरणात येथील एका डॉक्‍टराला आरोपी करण्यात आले असून, त्याची येथील पोलिसांतर्फे चौकशी सुरू आहे. असा प्रकार जिवंत व्यक्तीचे मृत दाखला देणाऱ्या या डॉक्‍टराविषयी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. 

अहमदाबादमध्ये गुन्हे दाखल
गुजरातस्थित विमा कंपनीकडून येथील अनेकांनी विमा उतरविला आहे. यातील ज्या मृतांचे दावे मंजूर झाले आहेत, असे अनेक जिवंत असल्याचे कंपनीला आढळल्यानंतर हे दावे मंजूर करणारे अधिकारी आणि संबंधित एजंट यांच्याविरोधात अहमदाबादमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर चौकशीत जिवंत असलेल्या व्यक्तीला मृत दाखविणारे कोण? याचा तपास सुरू असताना त्यात येथील डॉक्‍टराचे नाव पुढे आल्याने गुजरात पोलिसांनी त्याला पकडून नेले. तेथे त्याला पंधरा दिवस पोलिस कोठडीतही ठेवण्यात आल्यानंतर त्याची येथील पोलिसांतर्फेही चौकशी सुरू आहे. 

दोंडाईचा पोलिसांकडून गुप्त चौकशी 
दोंडाईचा येथे या डॉक्‍टराने संबंधित कंपनीचा विम्याचा दावा मंजूर करताना जिवंत व्यक्तीला मृत असल्याचा वैद्यकीय दाखला दिल्याचे गुजरात पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. विमा कंपनीला फसविण्यासाठी मृत नसलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकाला सहकार्य केल्याबाबत त्या डॉक्‍टराची दोंडाईचा पोलिसांकडून तीन महिन्यांपासून गुप्त चौकशी सुरू आहे. 

शहरात टोळीची शक्‍यता 
दोंडाईचा शहरासह परिसरात नामांकित विमा कंपनीच्या एजंटांची टोळीच तीन- चार वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. या टोळीकडून मृत असलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवीत त्याचा विमा उतरविला जायचा. नंतर त्याच व्यक्तीला मृत दाखवीत त्याचा दावा मंजूर केला जायचा. यात अनेक जिवंत व्यक्तींनाही मृत दाखवून त्याच्या दाव्याचे पैसे उकळण्यात आले. मात्र, कंपनीने अशा सर्व प्रकरणांची छाननी केली असता, ज्या व्यक्ती मृत दाखविल्या आहेत, प्रत्यक्षात ते जिवंत असल्याचे आढळल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. कंपनीने अहमदाबादमध्ये असे गुन्हे दाखल केल्यानंतर त्याचे धागेदोरे दोंडाईचा येथील "त्या' डॉक्‍टरापर्यंत येऊन पोहोचले. 

गुजरात पोलिसांकडून अटक 
मृत असल्याचे बनावट दाखले देणारा शहरातील हा डॉक्‍टरही या टोळीत सहभागी असल्याने अहमदाबाद पोलिसांनी त्याला महिन्यापूर्वी उचलून नेले. तेथे पंधरा दिवस तो पोलिस कोठडीत होता. त्याच्यावर दोंडाईचातही लवकरच दोषारोप दाखल केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची शहरात सध्या दबक्‍या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: Insurance for the deceased alive

टॅग्स