Jalgaon News : इराणी महिलेला आश्रय देणे पडले महागात; धरणगावच्या दोन भावांना ३ दिवसांची पोलीस कोठडी
Iranian Woman Given Shelter After Visa Expiry : धरणगाव येथे व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या संशयितांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, तपास यंत्रणांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
जळगाव: धरणगाव येथे इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या कुरेशी शेख रफीक शेख मुसा व शेख अहमद रजा शेख मुसा (दोघे रा. धरणगाव) या दोघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.