लोखंडी अँगल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : एकाला अटक, 4 फरार | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhule crime news

लोखंडी अँगल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : एकाला अटक, 4 फरार

धुळे : लळिंग (ता. धुळे) शिवारातील एमआयडीसीतून लोखंडी अँगल लांबविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा (thieves gang) मोहाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. एका चोरट्याला जेरबंद केले असून, त्याच्याकडून ५६ हजारांवर किमतीचे २७ लोखंडी अँगल हस्तगत केले. दरम्यान, त्याचे चौघे साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Iron angle stealing gang busted One arrested 4 absconding dhule crime latest marathi news)

हेही वाचा: तिघे सराईत चैनस्नॅचर जेरबंद; 7 तोळे सोने जप्त

१९ ते २० जुलैदरम्यान एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एच-६ मधील पत्र्याच्या अर्धवट शेडमधून चोरट्यांनी २७ लोखंडी अँगल लंपास केले होते. याप्रकरणी विवेक दिनकर सोनवणे (रा. गणेश निवास प्लॉट क्रमांक ६/७ बोरसेनगर, गोंदूर रोड, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्या सूचनेनुसार राहुल पाटील यांनी शोध पथकासह गुन्ह्याचा तपास करून प्राप्त माहितीच्या आधारे संशयित अर्जून मंगा अहिरे (रा. दिवाणमळा ता. धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच गुन्ह्यात सहभागी चौघा साथीदारांचीही नावे सांगितली.

ते साथीदार मात्र फरार आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. अटकेतील अर्जुन अहिरेच्या ताब्यातून ५६ हजार ७०० रुपये किमतीचे २७ लोखंडी अँगल पोलिसांनी हस्तगत केले.

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते, श्याम काळे, राहुल पाटील, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, मुकेश मोरे, राहुल गुंजाळ, समीर पाटील, धीरज गवते, जयकुमार चौधरी आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा: पुतण्यानेच मारला पावणे दोन लाखांवर डल्ला; घरफोडीची 24 तासात उकल

Web Title: Iron Angle Stealing Gang Busted One Arrested 4 Absconding Dhule Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dhulethief
go to top