धुळ्यातील ८३ गावे जल जीवन मिशनमध्ये

धुळ्यातील ८३ गावे जल जीवन मिशनमध्ये
Summary

नवीन जलकुंभ, जलवाहिनी किंवा जलस्रोतासाठी नवीन विहीर आवश्यक आहे, अशा कामांना यंत्रणेने तत्काळ मंजुरी द्यावी. जल जीवन मिशन योजनेत समाविष्ट गावांमध्ये टंचाई दूर होण्यास मदत होईल.

धुळे : जल जीवन मिशनमध्ये (Jal jeevan mission) धुळे तालुक्यातील ८३ गावांचा समावेश झाला आहे. यात पाणीपुरवठा योजनेशी निगडित कामे होतील, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. (Jal jeevan mission covers 83 villages in dhule taluka)

पाणीटंचाईप्रश्‍नी संपर्क कार्यालयात आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पढ्यार, सहाय्यक अभियंता जयदीप पाटील, शाखा अभियंता विजय गावित, बाजार समितीचे माजी सभापती गुलाब कोतेकर, मुख्य प्रशासक रितेश पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव खैरनार, पंचायत समितीचे गटनेते पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, बाबरेचे सरपंच संतोष राजपूत, सुरेश पाटील, गरताड ग्रामपंचायतीचे सदस्य राजीव पाटील, कृष्णा पाटील, बापू खैरनार, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

धुळ्यातील ८३ गावे जल जीवन मिशनमध्ये
कृषी सेवा केंद्रासह उत्पादन व वाहतुकीस परवानगी; धुळे जिल्‍हाधिकारींचे आदेश

गावनिहाय पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेत आमदार पाटील म्हणाले, की धुळे तालुक्यातील गावांमध्ये मे-जूनमध्ये जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ नियोजन करावे. नवीन जलकुंभ, जलवाहिनी किंवा जलस्रोतासाठी नवीन विहीर आवश्यक आहे, अशा कामांना यंत्रणेने तत्काळ मंजुरी द्यावी. जल जीवन मिशन योजनेत समाविष्ट गावांमध्ये टंचाई दूर होण्यास मदत होईल. टंचाई जाणविणाऱ्या गावांसाठी आतापासूनच विहिरींच्या अधिग्रहणाची सूचना द्यावी.

कार्यकारी अभियंता पढ्यार म्हणाले, की मे अखेरीस तालुक्यातील आर्णी, चिंचवार, नवलाणे, जुनवणे, अंचाळे तांडा, कुंडाणे (वेल्हाणे), बाबरे, तांडा- कुंडाणे, जुन्नर, नावरी, नावरा, रामनगर (नगाव) येथे टंचाई भासू शकते. तेथे विहीर अधिग्रहणासह आवश्यक त्या उपाययोजना यंत्रणेने कराव्या. पांझरा नदी काठावर २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे स्रोत आहेत. त्या गावांत टंचाई भासू नये म्हणून अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यां‍कडे केली होती. त्यांनी पांझरा नदीत पाणी सोडण्याची सूचना दिली. त्यामुळे २९ गावांचा टंचाईचा प्रश्‍नही मार्गी लागेल.

धुळ्यातील ८३ गावे जल जीवन मिशनमध्ये
बालविवाहात धुळे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर; कोरोनाकाळातील परिणाम

रामगरला सुविधा मिळेल

मांडळ, दोंदवाड, विंचूर, बोरकुंड, रतनपुरा येथे मे अखेरीस पाणीटंचाईची शक्यता असेल. त्यामुळे मांडळ लघुप्रकल्पातून आवश्यकतेनुसार पाणी सोडावे. आदिवासी बहुल रामनगर येथे आदिवासी वस्तीसाठी सातपायरी धरण क्षेत्रात विहीर खोदकामासह जलवाहिनीने पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

(Jal jeevan mission covers 83 villages in dhule taluka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com