अडीच लाखांचे सोने 61 हजारात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

जळगाव : मूळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी ट्रकचालक संजय भरवलाल देवडा (वय 45) याने निमखेडी शिवारातून चोरी केलेले सोने मुलगा आजारी असल्याचे सांगत जळगावातच 61 हजारात मोडले होते. तपासाअंती तालुका पोलिसांनी संशयित सराफाला अटक केली असून, दोघांना आज न्यायालयात हजर केल्यावर 16 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले आहे. 

अट्टल गुन्हेगाराने ट्रकचालकाच्या व्यवसायाला घरफोडीचे साधन बनवले होते. आंध्र प्रदेश ते गुजरात महामार्गालगतच्या नागरी वस्त्यांना लक्ष करीत घरफोड्या करून पसार होणारा ट्रकचालक संजय भवरलाल देवडा (वय 45) याला गुन्हेशाखेने राजस्थानच्या पाली जिल्ह्यात राहत्या घरी बेड्या ठोकल्या. अटक करून आणल्यावर पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने निमखेडी शिवारातील रमेश जगदेव सरदार यांच्या कडील घरफोडी कबूल केली होती. गुन्ह्यात अटक केल्यावर तालुका पोलिस ठाण्यातील तपासाधिकारी के. जी. तडवी यांनी सराफ बाजारातील व्यावसायिक प्रमोद रमेश विसपुते (वय-42, रा. बदाम गल्ली जुने जळगाव) याला अटक केली. अटकेनंतर संशयिताने 6 तोळे सोने काढून दिले असून बाजार भावा नुसार अडीच लाख रुपये किंमत असलेले सोने या सराफाने केवळ 61 हजारात खरेदी केल्याची कबुली दिली आहे. निमखेडी शिवारात सलग तीन घरे फोडण्यात आली असून संजय देवडा याने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही सलग तीन घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. 

10 वर्षे सापडलाच नाही 
अटकेतील संजय भवरलाल देवडा हा ट्रक चालक गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून जळगाव शहरात सलग घरफोड्या करीत असून वर्ष-2016 मध्ये त्याने मोठी घरफोडी केल्यावर तेथून मिळालेल्या एटीएम कार्डद्वारे जयपूर मध्ये रक्कम विड्रॉल केली होती. तेव्हाचा फोटोही पोलिसांनी मिळवला असून त्याही गुन्ह्यात संजय देवडा याला वर्ग करण्यात येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon 2.5 lakh rupeese gold 61 thousand