Jalgaon Airport
sakal
जळगाव: येथील विमानतळ व्यवस्थेतील सुधारणा व विकासाच्या संदर्भात काही सूचना करण्यासाठी, विमानतळाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासंदर्भात प्रयत्न करण्याच्या दृष्टीने गठीत करण्यात येत असलेली विमानतळ सल्लागार समितीच जळगावात गेल्या दीड वर्षापासून अस्तित्वात नाही. या समितीवर नेमायच्या सदस्यांच्या नावांवर एकमत होत नसल्याने समिती गठीत झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.