Airport Connectivity
sakal
जळगाव: विमानतळावरून कार्गो सेवा तसेच दिल्ली आणि नागपूरसाठी प्रवासी कनेक्टिव्हीटी सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (ता. २८) झाली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीचे अधिकारी तसेच जळगाव विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.