Jalgaon Airport
sakal
जळगाव: काही दिवसांपासून ‘इंडिगो’ कंपनीच्या गोंधळामुळे देशातील अनेक उड्डाणे रद्द झाली. त्याच पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने जळगाव विमानतळाचा आढावा घेतला असता दोन्ही विमान कंपन्यांची विमानसेवा सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. विमानतळावरील प्रवासी सुविधांमध्येही वाढ झाली असून, अकरा महिन्यांत तब्बल एक लाख १८ हजार १५१ प्रवाशांनी जळगाव विमानतळावरून हवाई सफर केल्याची माहिती समोर आली आहे.