विमानतळावर स्फोटक असल्याचा संकेत मीळताच धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

जळगाव  ः जळगाव-अहमदाबाद विमानसेवा "ट्रू-जेट'च्या माध्यमातून जळगावात सुरू आहे. आज नेहमीप्रमाणे दुपारी विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत असतानाच एका प्रवाशाकडे स्फोटक सामुग्री असल्याचे विमानतळावरील सुरक्षायंत्राने संकेत दिले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पोलिस दल आणि बॉम्बस्कॉडला तत्काळ पाचारण करून तपासणी केल्यानंतर प्रवासी धम्मानंद केशवलाल वालेचा यांच्याकडील चार बाटल्यांमध्ये असलेले द्रावण पोलिसांनी नष्ट केल्यावर विमानाचे सात मिनिटे उशिरा उड्डाण झाले. 

जळगाव विमानतळावर आज सायंकाळी "ट्रू-जेट' या कंपनीचे विमान अहमदाबादसाठी उड्डाणाच्या तयारीत होते. याचवेळी अकोला येथील धम्मानंद वालेचा हे विमानतळावर त्यांच्या सामानाची तपासणी करीत होते. तपासणीवेळी त्यांच्या बॅगेत डीएनटी आणि टीएनटी असे स्फोटक असल्याचे संकेत तपासणी यंत्राने दिले. स्फोटक असल्याचे कळताच सुरक्षा यंत्रणा जागृत होऊन तत्काळ त्यांनी एमआयडीसी पोलिसांसह नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. निरीक्षक रणजीत शिरसाठ गुन्हे शोधपथक आणि बॉम्बस्कॉड तातडीने विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. विमानतळावर पोहोचल्यावर प्रवाशांच्या साहित्याची नव्याने बॉम्बस्कॉडच्या यंत्राद्वारे तपासणी झाली. त्यात वालेचा यांच्या बॅगेत आढळून आलेल्या चार बाटल्यांची तपासणी करण्यात आली. वेगवेगळ्या सातपदरी सुरक्षा यंत्रातून या साहित्याला तपासण्यात आल्यावर तज्ज्ञांनी हे साहित्य चिंच, ऊस आणि गुळाचे मिश्रण असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी चारही बाटल्यांतील द्रावण नष्ट केले. 

विमानाला सात मिनिटे उशीर 
यंत्राने स्फोटके असल्याची माहिती देईपर्यंत कुठल्याही प्रवाशाला माहिती नव्हती. बॉम्बस्कॉड विमानतळावर दाखल झाल्यानंतर संशयाची सुई वळल्याने प्रवासी आणि पोलिसांचीही बऱ्यापैकी तारांबळ उडाली. बॉम्बस्कॉडकडे साहित्य सोपविल्यानंतर त्यांनी अत्याधुनिक यंत्रांद्वारे तपासणी केल्यावर द्रावणाचे नमुने तपासले. ही सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon airport, there was a hint of explosives