Girish Mahajan
sakal
जळगाव: शहराच्या राजकारणात शुक्रवार मोठ्या राजकीय घडामोडींचा दिवस ठरला. माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह १५ माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे जळगाव शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला.