जळगाव: आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अन्य पक्षांमधून भाजपत येण्यासाठी एक मोठा गट सध्या कुंपणावर आहे. या गटाची ‘एन्ट्री’ जवळपास ठरली होती. मात्र, भाजपतील अंतर्गत विरोधामुळे या ‘इनकमिंग’ला ब्रेक लागला आहे. अर्थात, हा केवळ ब्रेक असून, नेत्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळात ही मोहीम पूर्ण होईलच, असेही मानले जात आहे.