जळगाव: बोरनार (ता. जळगाव) येथील पती-पत्नीचा वाद विकोपाला गेला. संतप्त पतीने कुऱ्हाडीने पत्नीवर सपासप वार केले. त्यानंतर लगेचच मंगळवारी (ता. १९) सकाळी सातच्या सुमारास पतीने म्हसावदजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आनंदा ऊर्फ छोटू महारू धामोळे-धनगर (वय ४५) असे मृताचे नाव असून, जखमी रेखा धामोळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद झाली आहे.