Jalgaon News : राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाचे जळगाव बसस्थानकात निधन
Jalgaon Bus Driver Collapses at New Bus Stand : दुपारी एकच्या सुमारास चक्कर येऊन कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर पंडित साळुंखे असे मृत बसचालकाचे नाव आहे.
जळगाव: शहरातील नवीन बसस्थानकात बुधवारी (ता. २७) दुपारी एकच्या सुमारास चक्कर येऊन कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर पंडित साळुंखे (वय ४२, रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) असे मृत बसचालकाचे नाव आहे.