Jitendra Salunkhe
sakal
जळगाव: शहरातील गेंदालाल मिलमधील ४० वर्षीय गृहस्थाचा कंडारी (ता. भुसावळ) येथे चॉपरने वार करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. ५) रात्री अकराच्या सुमारास घडली. जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राज ऊर्फ बाबू, मयूर ऊर्फ विकी अलोने आणि दीपक शंखपाळ यांच्याबरोबर एका हॉटेलवर मद्यपान करत असताना त्यांच्यात वाद झाला.