Pollution on Jalgaon Highway
sakal
जळगाव: शहरातील कालिंकामाता चौक ते तरसोद फाटा दरम्यान महामार्गावर सध्या धुळीच्या समस्येमुळे वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील खोदकाम, अपूर्ण डांबरीकरण आणि सातत्याने सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.