Cold Wave
sakal
जळगाव: जिल्ह्यात शनिवारी (ता. २०) किमान तापमानाने नीचांक गाठत सहा अंशांपर्यंत खाली आले आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात आगामी दोन दिवस थंडीचा तडाखा पुन्हा वाढेल. प्रशांत महासागरातील थंड पाण्यामुळे उत्तर भारतातून कोरडे वारे दक्षिणेकडे सरकत आहेत. यामुळे रेडिॲक्टिव्ह कूलिंग, अर्थात रात्री थंड होण्याची प्रक्रिया वेगाने होत असल्याने थंडीचे प्रमाण पुन्हा वाढू शकेल, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तविला आहे.