algaon weather
sakal
जळगाव: शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून १० ते १२ अंशांच्या खाली तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाही शीतलहरींमुळे गारठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. आणखी पुढील दोन ते तीन दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.