Cotton Price
sakal
जळगाव: यंदा खरिपात अतिवृष्टीने कापसाचे झालेले कमी उत्पादन, व्यापाऱ्यांकडून कापसाला मिळणारा कमी भाव आदी कारणांमुळे बाजारात कमी प्रमाणात कापूस विक्रीस आला. आतापर्यंत ‘सीसीआय’तर्फे पावणेदोन लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. खासगी व्यापाऱ्यांनी साडेतीन लाख गाठी निर्मिती होतील, एवढा कापूस खरेदी केला.