
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नातेवाईकांच्या लग्नसमारंभात बापानेच आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्या. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करणाऱ्या बापाला वऱ्हाडींनी बेदम मारहाण केल्याने त्याचीही प्रकृती गंभीर आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे.