Cyber Fraud
sakal
जळगाव: शहरातील आयोध्या नगरातील एक फर्निचर व्यावसायिक तर, दुसरा गॅरेजचालक अशा दोघांना ‘आचल’ नावाच्या एकाच महिलेने फोन करून ऑनलाइन गंडा घातला आहे. त्यापैकी फर्निचर व्यावसायिकाची ४ लाख ६१ हजारांत तर गॅरेजचालकाची ५ लाख ३५ हजारात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दोघा तक्रारदारांचे आडनाव देखील सारखेच असून, या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.