India Post
sakal
जळगाव: डाक विभागाकडून आपल्या सेवांचा विस्तार केला जात असताना ग्राहक देखील या सेवांचा लाभ घेत असल्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र आतापर्यंत ग्राहकांना कोणतेही काम करण्यासाठी पोस्ट कार्यालयात यावे लागत होते. परंतु, डाक विभागाने देखील आपल्या सर्व सेवा एका क्लिकवर आणल्या आहेत. अर्थात स्मार्ट फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘डाक सेवा २.०’ ॲप लॉंच केले असून, डाक विभागाच्या सर्व सेवांचा लाभ घर बसल्या घेता येणार आहे.