Jalgaon District Bank
sakal
जळगाव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या जळगावातील नवीपेठेतील शाखेची ‘दगडी बँक’ म्हणून प्रसिद्ध व शतकोत्तर परंपरा लाभलेली वास्तू पुनर्विकासाच्या नावाखाली विकण्याचा घाट विद्यमान संचालक मंडळाने घातल्याचे वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमांतून, शेतकरीपुत्रांच्या योगदानातून आणि हजारो भुमिपुत्रांच्या घामातून उभ्या राहिलेल्या बँकेची इमारत विकण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, शेतकरीवर्गातून त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.